रॅम्पचे बुधवारी उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवड । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलाच्या रॅम्पचे बुधवारी सकाळी 11 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महापालिकेतर्फे निगडी ते दापोडी बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात आला असून, या मार्गामध्ये नाशिक फाटा येथे हिंजवडी ते मोशी रस्ता छेदत आहे. सुरळीत वाहतुकीसाठी व सिग्नल विरहीत चौकासाठी नाशिक फाटा चौकात उड्डाणपुलाचे नियोजन केले आहे. हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिकांना पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडीकडे जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे.