रेंभोटाचा व्यावसायीक तरुण अपघातात जागीच ठार

0

रावेर- तालुक्यातील रेंभोटा येथील रहिवासी तथा रावेरातील व्यावसायीक ऋषीकेश उर्फ टिपू ब्रिजलाल कोळी (वय 25) हे विवरे येथून काम आटोपून रावेरकडे जात होते. रविवारी रात्री विवरे जवळील पारसे पुलालगत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ऋषिकेश यांचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ते विवरे येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते 14 ऑक्टोबरच्या रात्री रावेर मार्गे रेंभोटा येथे जाणार होते. मध्येच पारसे पुलाजवळ त्यांच्या एमएच 19.बीजे.6 या क्रमांकाच्या कारला अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे झालेल्या अपघातात ऋषिकेश कोळी यांचा मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन भाऊ असा परिवार आहे.