रेआलचा निकोसियावर विजय

0

मद्रिद । निलंबनाच्या कारवाईनंतर पुन्हा मैदानात परतलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर गतविजेत्या रेआल माद्रिदने चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात एपीऑईल निकोसिया संघाचा 3-0 असा पराभव केला. स्पॅनिश सुपर लीग स्पर्धेदरम्यान रेफ्रीला धक्का दिल्लयाबद्दल पाच सामन्यांचे निलंबन पूर्ण झाल्यावर पुन्हा संघाशी जोडल्या गेलेल्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सामन्यात संघाला बढत मिळवून देण्यासाठी फार जास्त वेळ घेतला नाही. रोनाल्डोने सामन्यातील 12 व्या मिनिटालाच पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्‍या हाफमधील 51 व्या मिनिटाला त्याने संघाची आघाडी आणखी वाढवली. र्सिजयो रामोसने 61 व्या मिनिटाला गोल करुन संघाच्या विजयाचे अंतर 3-0 असे केले. अन्य लढतींमध्ये रॉटरडॅमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मँचेस्टर सिटी संघाने डच लीग विजेत्या फॅयेंऑर्ड संघाचा 4-0 असा धुव्वा उडवला.

संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावताना जॉन स्टोनने दोन गोलांचे योगदान दिले. लिव्हरपूलमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात लिव्हरपूल आणि सॅव्हिलो यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरी राहिली. लंडनमध्ये ह गटातील सामन्यात टॉटेनहॅम संघाने ब्रॉसिया डोर्टंनहॅमला 3-1 अशी मात दिली. मागील 13 सामन्यांमध्ये टॉटेनहॅमने मिळवलेला हा तिसरा विजय आहे.