फिलीप एरिनो । गतविजेता स्पॅनिश क्लब रेआल माद्रिदने शानदार कामगिरी करताना इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडवर 2-1 असा विजय मिळवत चौथ्यांदा युरोपियन सुपर कप जिंकला. या विजयामुळे रेआल माद्रिद विजेतेपद कायम राखणार्या एसी मिलान क्लबच्या पंक्तित जाऊन बसला आहे.
अंतिम सामन्यात रेआल माद्रिदने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता. ब्राझिलचा 25 वर्षीय मिडफिल्डर कॅसमिरोने 24 व्या मिनीटालाच अप्रतिम गोल करत माद्रिदला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी राखणार्या रेआल माद्रिद संघाने सामन्याच्या उत्तरार्धातही आपला दबदबा कायम राखला.
दुसर्या सत्रातील 52 व्या मिनीटाला स्पेनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू इस्कोने आठ यार्डांवरून गोल करत गतविजेत्या रेआल माद्रिदला सामन्यात 2-0 असे आघाडीवर नेले सामन्यात 0-2 असे पिछाडीवर पडलेल्या मँचेस्टर युनायटेडला स्ट्रायकर रोमेलु लुकाकूने 62 व्या मिनीटाला गोल करत दिलासा मिळवून दिला. रेआल माद्रिदचा झीनेझीन झीदानच्या मार्गदर्शनाखालील पाचवा विजय आहे.