रेकॉर्डवरील गुन्हेगारच निघाला दुचाकीचोर

0

शनिपेठ पोलिसांकडून दोनच दिवसात दुचाकीसह ताब्यात

जळगाव- शहरातील जुने जळगाव परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामागे घरासमोरुन गोविंदा रघुनाथ चौधरी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना 9 रोजी घडली होती. दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश पुंडलिक ठाकरे (वय-39 रा कोळीपेठ) याने दुचाकी चोरल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात ठाकरे यास शुक्रवारी दुचाकीसह अटक केली आहे. त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

10 जानेवारी रोजी गोविंदा चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे व सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक व्ही.डी.ससे यांनी गुन्ह्याच्या शोध कामी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम पिंजारी, दिनेशसिंग पाटील , गजानन बडगुजर, गिरीश पाटील, नितीन बाविस्कर, नरेंद्र ठाकरे, योगेश बोरसे, हकीम शेख यांच्या पथकाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पथाकने सुरेश ठाकरे यास चोरीच्या दुचाकी (क्र एम.एच 19- यु.टी. 3399) अटक केली.