रेखा चौधरी यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

0

नंदुरबार । येथील तैलिक समाजाचे ज्येष्ठनेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी व डॉ.रविंद्र चौधरी यांच्या भगिनी आणि भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर रेखा चौधरी यांना नुकतेच दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘द पिलर ऑङ्ग हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री यांच्यावतीने रेखा चौधरी यांना प्रदान करण्यात आला. ही मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी अभिमानाची बाब आहे.

47 डायनॅमिक स्त्रियांमध्ये अवॉर्ड
रेखा चौधरी ह्या नंदुरबारच्या कन्या आहेत. या पुरस्कार सोहळ्यात रशिया, यु.के., स्पेन आणि अङ्ग्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, ऍम्बेसेडर व सरकारी क्षेत्रातील मंत्री, अधिकारी, विविध व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्वांचा सहभाग होता. अवॉर्ड स्विकारल्यानंतर रेखा चौधरी यांनी सांगितले की, संपूर्ण जगातील 47 डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरुन आले, असे त्या म्हणाले.