रेखा भोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव !

0

पिंपरी-चिंचवड-स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संस्कार प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ जणांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात रेखा भोळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

संस्कार जत्रा २०१९चा समारोप ज्ञानदिप मंडळ बिजलीनगर येथे प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले, माजी महापौर अपर्णा डोके, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक नामदेव ढाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, बाबासाहेब मेमाणे, विश्वेश्वर ज्ञानदिप मंडळ अध्यक्ष महेश कलाल, सुनिता गायकवाड आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांचा झाला सन्मान
सौरभ गोखले (कलारत्न पुरस्कार), सचिन चिखले (समाजरत्न पुरस्कार), विवेक मुगळीकर (समाजरत्न पुरस्कार), संगीता जाधव (समाजरत्न पुरस्कार), भाऊसाहेब मातणे (संस्काररत्न पुरस्कार), सुलभा पवार (समाजरत्न पुरस्कार),सोनम जांभूळकर (समाजरत्न पुरस्कार), भाग्यश्री काळभोर (संस्काररत्न पुरस्कार), अशोक वाळूंज(समाजरत्न पुरस्कार), काशिनाथ पावसे (समाजरत्न पुरस्कार), बाबासाहेब वैद्य(संस्काररत्न पुरस्कार), रामदास वाडेकर (उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार), संजय विसपुते (कलारत्न पुरस्कार), विद्याधर कुंभार (धन्वंतरी पुरस्कार), मकरंद पांडे, नितीन धिमधिमे (युवारत्न पुरस्कार), संतोष भिंगारे (समाजरत्न पुरस्कार) आदींना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.