रेडक्रॉसतर्फे गरजुंना होणार दहा लाखाचे कपडे वाटप!

0

जळगाव : ग्रामीण भागातील गरजु, गरीब, उपेक्षीत घटक, एचआयव्ही ग्रस्त, अनाथालय, आदीवासी भागातील नागरिकांना आगामी काळात सेवाभावी वृत्ती जोपासत इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे दहा लाख किंमतीच स्वेटर, चादर, महिलांसाठी साड्या, लहान मुलांसाठी कपडे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. रक्तदान, आपत्ती व्यवस्थापन, जेनेरीक मेडीसीन व हॉस्पिटल इत्यादी क्षेत्रात वर्षभरासाठी आखण्यात आलेल्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.

13 सॅटेलाईट सुरु होणार
लवकरच सोसायटीतर्फे जिल्ह्याभरात 13 सेटेलाईट सुरु करण्यात येणार आहे. त्याद्वारे जिल्हा मुख्यालयापासून तर तालुकास्तरापर्यत रक्त पुरवढा करण्यात येणार आहे. रेडक्रॉस रक्तपेढी दरवर्षी 5 हजार रक्तपिशव्यांचे संकलन करीत होती. सद्य स्थितीत सोसायटीतर्फे 25 हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले जात आहे. तसेच दोनशे थॅलेमिया, सिकलसेल्स, प्लॅस्टिक अ‍ॅनिमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त पुरवढा करण्यात येत असतो. अशी माहिती रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष
गनी मेनन यांनी दिली.

जेनेरिक चळवळ उभारणार
गरिबांना परवडेल अशा कमी किंमतीत औषधोपचार उपलब्ध व्हावा यासाठी जेनेरिक मेडिसीन चळवळ सुरु करण्यात आलेली आहे. सद्य स्थितीत शहरात 5 जेनेरिक मेडिसीन सुरु असून या माध्यमातून औषधाच्या मुळ किंमतीच्या 35 टक्के किंमतीत औषधे उपलब्ध होणार आहे. जेनेरीक औषधोपचाराचा प्रसारासाठी जेनेरीक क्रांतीच्या माध्यमातून चळवळ उभारण्यात येणार आहे. अशी माहिती शेखर सोनाळकर यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहत असतात. यावेळी रेडक्रॉस रक्तपेढी चेअरमन प्रसन्नकुमार रेदासणी, उपाध्यक्ष गनी मेनन, सचिव विनोद बियाणी, सहसचिव राजेश यावलकर, अँड.हेमंत मुदलीयार, पुष्पा भंडारी, डॉ. उल्हास कडूसकर यांच्या समवेत कार्यकारीणीतील सदस्य उपस्थित होते.