रेडक्रॉस दिनानिमित्त सेवाकलाविष्कार

0

जळगाव । जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्ताने सोमवार 8 मे रोजी जळगाव शहरात भव्य ‘सेवाकलाविष्कार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जेष्ठ चित्रकार कलावंत, चित्रकला शिक्षक व कला प्रेमीचे सक्रिय सहकार्य मिळत आहे. या ‘सेवाकलाविष्कार’ कार्यक्रमात जिल्ह्यातील कलाप्रेमी कलाशिक्षक विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि नागरिकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपाध्यक्ष गनीमेमन, सचिव विनोद बियाणी, प्रकल्प प्रमुख तथा सहसचिव राजेश यावलकर, रक्तपेढी चेअरमन डॉ. रेदासनी यांच्यासह कलाशिक्षक आदि उपस्थित होते.

रक्तदान जागृती आभियान
एफ एम माध्यमातून रक्तदान जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त रक्तदानासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे जेणेकरून रुग्णांना पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊन सुरळीतपणे रक्तपिशवी व रक्तघटकांचा पुरवठा करणे सुलभ होईल. सन्मान सोहळा आणि सर्व कलाकृतींचे स्वतंत्ररित्या जून 2017 मध्ये भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून यावेळी या उपक्रमात सहभागी सर्व चित्रकार विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

चित्रकारांसह कलाशिक्षकांचा सहभाग
जळगाव शहरातील विविध विद्यालय, महाविद्यालयातील खाजगी क्लासेस चे चित्रकलाशिक्षक, विद्यार्थी तसेच नामवंत आणि नावलौकिक असलेल्या जेष्ठ चित्रकार कलावंत अश्या निवडक 300 जण सेवाकलाविष्काराच्या माध्यमातून या भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 1 हजार फूट लांब कॅन्व्हास्वर साकारणार भव्य कलाकृती काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्दान व उद्दान समोरील रस्त्याच्या पश्चिमेकडे भिंतीच्या लगत रस्त्याच्या बाजूने 3 फूट ऊंचीचे 1 हजार फुट लांब सरळ महाबळ रोड पर्यंत बँनर कापड लावले जाणार आहे. त्यावर या सर्व कलाकारांना आपली कला सादर करता येणार आहे. एकाचवेळी 300 निवडक नामवंत चित्रकार आपली कला सादर करताना जळगावकरांना प्रथमच पाहायला मिळणार आहे. एक मोठ्या 10 बाय 6 च्या कॅनव्हासच्या कोर्‍या कापडावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध रंगाची ऊधळण करून रंगीत मोठी कलाकृती उद्घाटन प्रसंगी साकारली जाणार आहे. बाल चित्रकारांचे तीन ग्रुप तयार करण्यात आले आहे 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी या दोन समुहामध्ये – रंगभरण स्पर्धा तसेच 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी रक्तदान श्रेष्ठदान व माझी समाजसेवा या विषयाच्या कल्पनेवर आधारित – चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटक, चित्रकार सेवाकलाविष्कार, चित्रकलाकार, चित्रकला विद्यार्थी व जमलेले मान्यवर नागरिक यांच्या शुभहस्ते ‘जागतिक रेडक्रॉस दिन – 2017’ निमित्त आकाशात शेकडो बलून एका वेळी
सोडतील.

रंगभरण, चित्रकला स्पर्धा
बाल चित्रकारांचे तीन ग्रुप तयार करण्यात आले आहे 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी या दोन समुहामध्ये – रंगभरण स्पर्धा तसेच 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी रक्तदान श्रेष्ठदान व माझी समाजसेवा या विषयाच्या कल्पनेवर आधारित – चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रंगभरण व चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदवणेची आवश्यकता नाही. त्यांनी 8 मे रोजी दुपारी 3 वाजता भाऊंचे उद्यान येथे पॅड, पेन्सिल, रबर, शार्पनर, रंगसंच व्हॅक्स कलर/वॉटर कलर, ब्रश, रंग पॅलेट डिश इत्यादि सोबत आणणे आवश्यक आहे, चित्र काढण्यासाठी चित्र कागद व कोरा कागद रेडक्रॉस च्या वतीने पुरविला जाणार आहे. येत्या जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर पुरस्कारचे वितरण होईल.