रेडक्रॉस रक्तपेढीस जिल्हाधिकार्‍यांची भेट

0

जळगाव । किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी रेडक्रॉस रक्तपेढीला संध्याकाळी सदिच्छा भेट दिली. सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचा ओळख परिचय झाल्यानंतर त्यांचा रेडक्रॉस पदाधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले. या प्रसंगी रेडक्रॉसचे पदाधिकारी गनी मेमन – उपाध्यक्ष, वनोद बियाणी – मानद सचिव, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, राजेश यावलकर , घन:श्याम महाजन, डॉ. उल्हास कडूसकर, संदीप काबरा व अ‍ॅड. हेमंड मुदलीयार तसेच अधिकारी लक्ष्मण तिवारी, डॉ. अनिल चौधरी, महेश सोनगीरे, उज्वला वर्मा, संजय साळुंखे, सैय्यद जाफरअली, राजेंद्र कोळी, सतिष मराठे, धर्मेंद्र टेमकर, मनोज वाणी, इंगळे, उमाकांत शिंपी, शीतल शिंपी, उपस्थित होते.