रेडा गावच्या ग्रामदेवतेचा भंडारा सुरू

0

इंदापूर । तालुक्यातील रेडा गावचे ग्रामदैवत सर्जननाथ देवस्थान असून 100 वर्षांच्या परंपरेनुसार आमटी-भाकरी व सांजा असे भंडारे तब्बल महिनाभर चालतात. पहिला मान ग्रामपंचायत व गावकर्‍यांचा असतो हा भंडारा गावच्या सरपंच विमल गायकवाड व तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष काशिनाथ देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान करण्यात आले.

रेडा गावचे ग्रामदैवत सर्जननाथ देवस्थान आहे श्रावण महिन्यात या ठिकाणी संपूर्ण गावातील नागरिकांना आमटी-भाकरी व सांजा असे भंडारे अन्नदान देण्यांची प्रथा आहे; परंतु पहिल्या मान गावभंडारा करून इतर भंडारे सुरू होतात यंदाही गावभंडार्‍यांला माने देऊन भंडारे सुरू झालेले आहेत. गावातील लहानांपासून ते वृद्ध लोक घरची ताटली तांब्या मोकळे घेऊन येतात सर्जननाथ देवस्थान प्रारंगाणत भोजनाच्या आस्वाद घेतात. आमटी ही सर्व भाजी एकत्र करून बनवतात, तर चुलीवर आजही भाकरी गरमागरम जेवताना वाढल्या जातात, तर सांजा मकेच्या पिठापासून सांजा केलेला जेवताना वेगळीच मजा देतो तसेच आमटी लहान मुले देखील भुरका मारून पेतात, कितीही मोठा पदाधिकारी असला तरी देखिल मोकळ्या जागेवरच बसून जेवण करावे लागते.