शहरातील बांधकाम क्षेत्रातील मंदी हटण्यास पोषक वातावरण
मंदी हटण्यासह घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळेल, असा आशावाद
पिंपरी-चिंचवड : परवडणार्या घरांसासाठी प्रयत्न सुरू असतानाच राज्य राज्य सरकाने रेडीरेकनचे दर गेल्यावर्षीचेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. बांधकाम क्षेत्रातील मंदी हटण्यास यामुळे थोडीफार मदत होईल, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागला आहे. तसेच घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळणार आहे.
शहरासह लगतच्या भागात उपनगर आणि पीएमआरडीएच्या हद्दीत गृहप्रकल्पांची कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये मंदी असल्यामुळे रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी येथील बांधकाम व्यावसायिक संघटनांकडून मागणी करण्यात येत होती. ती लक्षात घेऊन राज्य सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात रेडीरेकनरचे यापूर्वीचेच दर कायम राहणार आहेत.
असा ठरतो रेडीरेकनरचा दर
एखाद्या भागात नवीन प्रकल्प येणार असल्यास किंवा विकासाची कामे सुरू असताना त्या ठिकाणाचे दर वाढविले जात नाहीत. संबंधित ठिकाणाच्या बाजारपेठांमधील वस्तुस्थितीचे आकलन करून वार्षिक दर मूल्य (रेडीरेकनर) आणि चालू बाजारभाव यांची सांगड घालून रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात येतात, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक नोंदणी विभागाकडून देण्यात आली.
’पीएमआरडीए’तील बांधकाम क्षेत्र वाढीचा दर – 40 टक्के
‘क्रेडाई’ संघटनेचे पिंपरी-चिंचवडमधील सभासद – 200
संघटनेचे सभासद नसलेले बांधकाम व्यावसायिक – 300
पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम क्षेत्र वाढीचा दर – 40 टक्के
पुण्यातील बांधकाम क्षेत्र वाढीचा दर – 20 टक्के
शहरातील दर
वार्षिक मुल्य दर तक्ता 2018-19 (प्रतिचौरस फुटाचा रुपयामधील दर)
परिसर जमीन सदनिका कार्यालय दुकाने
पिंपरी कॅम्प 1367 5377 5582 8542
चिंचवड 1231 4211 6053 8542
भोसरी 1848 4133 4412 4945
आकुर्डी 1022 3984 4290 4717
निगडी 1666 4447 4466 9759
सांगवी 1793 1511 1670 6798
पिंपळे गुरव 1158 5270 5687 5788
पिंपळे निलख 730 4215 5045 5729
पिंपळे सौदागर 764 4222 4740 5149
वाकड 787 4333 4618 6341
रहाटणी-काळेवाडी 597 3745 4060 5218
रावेत 502 4399 4497 4976
दापोडी 830 4471 6392 6017
मोशी 1526 4597 4534 6091
तळवडे 225 3593 4000 4128
डुडुळगाव 219 3955 2756 5048
किवळे 274 3255 3962 4712
मामुर्डी 277 26174160 4535
पुनावळे 313 3843 4141 4683
चर्होली 297 3833 4006 4273
वडमुखवाडी 218 4092 4525 4733
चोविसावाडी 296 3814 4125 4398
बोपखेल 249 3424 3827 4091
दिघी 420 3976 4186 4303
ताथवडे 376 4172 4369 4875
चिखली 1100 4396 4516 5436