रेडीओग्राफर्स हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील दुवा

0

नंदुरबार। रेडीओग्राफर्स हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. रेडीओग्राफर्स असोसिएशन नेहमी ज्ञान दानाचे कार्य करते, असे प्रतिपादन नॅशनल कोऑर्डीनेटर शंकर भगत (टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई) यांनी केले. ते येथील नंदुरबार जिल्हा रेडीओग्राफर्स असोसिएशनच्या कार्यशाळेत बोलत होते. येथील लायन्स क्लब हॉलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा रेडीओग्राफर्स असोसिएशनची कार्यशाळा घेण्यात आली.

रेडीओग्राफर्स एकत्र आल्यास ज्ञानात भर पडणार
यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र रेडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास भदाणे, नॅशनल कोऑर्डीनेटर शंकर भगत (टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई) तसेच धुळे येथील राम युनिटचे सचिव महेंद्र भामरे हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना शंकर भगत म्हणाले की, रेडीओग्राफर्स हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. रेडीओग्राफर्स असोसिएशन ही कुठलीही युनियन नसून असोसिएशन फक्त ज्ञान दानाचे कार्य करते. रेडीओग्राफर्स एकत्र आल्यावर त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. नंदुरबार जिल्हा रेडीओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय बडगुजर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, आजच्या आधुनिकतेच्या काळात वेळोवेळी टेनिक्लॉजीमध्ये होणार्या बदलांविषयी आपल्या ज्ञानात भर घालावयाची असेल तर ग्रामीण भागातील रेडीओग्राफर्सने दरवर्षी होणार्या कार्यशाळेत सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच यावेळी महेंद्र भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन सोनार तर आभार ऋचिता निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश राजपूत, अभिजीत वळवी, अशोक महाजन, सुनिल वळवी, विष्णू पटेल, विजय अहिरे, सलिम वडवाला, विकास तडवी, सुमित सोनवणे, आकाश परमार आदींनी परिश्रम घेतले.