मुंबई – राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नाहीत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.