रेड चिलीज एंटरटेन्मेंटने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला

0

नवी दिल्ली : शाहरुख खानचा ‘झिरो’ या चित्रपटात काही आक्षेपार्ह गोष्टी असल्याचा आणि यामुळे शिख समाजाच्या भावना दुखावत असल्याचा आरोप समितीने केला आहे. दिल्लीच्या शिख गुरुद्वारा प्रबंधन समितीकडून मिळालेल्या नोटीसीच्या विरोधात रेड चिलीज एंटरटेन्मेंटने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे.

‘झिरो’च्या पोस्टर आणि प्रोमोमध्ये शाहरुख खान अंडरवेअरमध्ये दाखवला असून त्याने शिख लोकांचे धार्मिक प्रतिक असलेले कृपाण वापरल्याचे समितीने आरोप केला आहे.