रेणुकामाता मंदिर परिसरात वृक्षारोपण

0

मुक्ताईनगर। येथील रेणूकामाता मंदिर परिसरात सभापती राजु माळी यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा वृक्षारोपण केले. मागील वर्षी सुमारे 50 व यावर्षी 100 अशी 150 झाडांची लागवड केली. त्यात वड, कडूनिंब, पिंपळ, शिषम आदी वृक्षांचा समावेश आहे. मागील वर्षी लावलेले 90 टक्के झाडे वर्षभर पाण्याच्या नियोजन करुन स्वत: त्यांची निगराणी ठेवल्याने आज तेथे 15 ते 20 फुटांवर रोपे वाढलेली दिसतात. सदर वृक्षलागवडीस त्यांना स्वयंपूर्तीने पंचायत समिती कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी लागवड करतांना सुध्दा त्यांनी नियोजन केले असता त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, पंचायत समिती कर्मचारी सुधाकर राठोड, नरवाडे, युवराज महाजन, नितिन पाटील व अनिल कोळी उपस्थित होते.