रेणुका स्वरूप प्रशालेत विज्ञान सप्ताह साजरा

0

पुणे: विज्ञान दिनाच्या औचित्याने रेणुका स्वरूप प्रशालेत विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अगस्त्य फौंडेशन व रेणुका स्वरूप यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

सर्जनशील शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्याचा वापर अध्यापनात कसा करावा यासंदर्भात शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत ‘द्रवयुक्त नायट्रोजन प्रयोग’ याविषयी पुणे विद्यापीठातील राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी निबंध, रांगोळी, चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसादात व सहभागात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका जाळींद्रे, जेष्ठ शिक्षिका कदम व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमा गोंधळेकर यांनी तर आभार प्रदर्शन रत्नमाला कांबळे यांनी केले.