रेणूकास्वरूपमध्ये हिंदी दिन साजरा

0

पुणे । सदाशिव पेठेतील रेणूकास्वरूप प्रशालेत गुरुवारी (दि.१४) साजरा करण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे व्याख्याते प्रा. रविकिरण गळंगेे यांनी प्रशालेतील मुलींना हिंदी भाषेचे महत्त्व व मानक वर्तनीनुसार हिंदी भाषेचा प्रयोग कसा करावा; याबाबत मार्गदर्शन केले.

यानिमित्ताने प्रशालेत हिंदी भाषेतून परिपाठ घेण्यात आला. कवी हरिवंशराय बच्चन, सुमित्रा पंताजी, महादेवी वर्मा यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले. तर काही बोधपर कथा सादर केल्या. तसेच सर्व फलकांवर हिंदी भाषेतील सुविचार, कविता, हिंदी दिनाची माहिती दिली.
मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, विजयमाला घुमे यांनी यासाठी सहकार्य केले. रागिणी भालेराव यांनी प्रास्ताविक केले. रत्नमाला कांबळे यांनी आभार मानले.