मुक्ताईनगर : रेतीची अवैधरीत्या वाहतूक करत असलेले डंपर चारठाणा-बोदवड दरम्यान मुक्ताईनगर तहसीलदार स्वेता संचेती यांनी पकडल्याने अवैध वाळू वाहतूकदारांच्या गोटात खळबळ उडाली. बोदवड येथे रेशन दुकानाची तपासणी करून परत जात असलेल्या तहसीलदार श्वेता संचेती यांना कुर्हा-मुक्ताईनगर रस्त्यावर चारठाणा फाट्या जवळ अशोक लेलॅण्ड कंपनीचे नंबरप्लेट नसलेले डंपर दिसताच त्यांनी डंपरचालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो ंपर ड्रायव्हर चावी घेऊन पळाला. यावेळी तहसीलदार संचेती यांनी डंपरमध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुक्ताईनगर येथे नेले. चालक चावी घेऊन गेल्याने बंद असलेले डंपर तलाठी संतोष गायकवाड, तलाठी व्ही.व्ही.नाईक, कोतवाल मिथुन मुंडाळे यांनी दुसर्या वाहनाच्या सहाय्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयात जमा केले. दरम्यान, डंपर चालकाने डंपरमधील रेती सुकळी येथे खाली केल्याचे तलाठी यांनी सांगितले.