कल्याण : कल्याण शहराती रेतीबंदर परिसराती बेकायदा रेती उपसा करणा-या व्यावसायिकांविरोधात ठाणे जिल्हाधिका-यांनी धडक कारवाई करुन ७२ कोटी रुपयांची रेती व साधनसामग्री जप्त केली. या कारवाई पाठोपाठ रेतीबंदर परिसरातील १५० बेकायदा बांधकामांना नोटीसस बजावण्यात आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ तेथील रहिवाशांनी मंगळवारी केडीएमसीवर मोर्चा काढला.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रेतीबंदर परिसरातील १२१ तर केडीएमसीने ३६ बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. ही बांधकामे रेती व्यावसायिकांना केली असल्याचे नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे ही बेकायदा बांधकामे पाडण्याची जोरदार कारवाई संबंधित विभागाकडुन सुरु केली जाणार आहे. त्यात बहुतांश गोठयांचा समावेश आहे. एका गोठयात १०० ते २०० म्हशी आहेत. प्राण्यांचे गोठे शहराबाहेर असले पाहिजेत असे महापालिका अधिनियमात असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे कल्याणमधील दुध व्यावसायिक संकटात येणार आहेत. हे गोठे बेकायदा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. कल्याण रेतीबंदर पाठोपाठ डोंबिवली रेती बंदरातील रेती व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. रेतीव्यावसायिकांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सिंधुदुर्गच्या धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा दिला आहे. रेती उपशामुळे कांदळवन नष् होत असल्याची बाब माहिती आधिकार चळवळीतील कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी यापूर्वीच निदर्शनास आणली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईची नोटीस संबंधित सर्व खात्यांना दिली होती. जिल्हाधिकारी, मेरीटाईम बोर्डाचे आधिकारी व महापालिका आयुक्त यांनी जाणीवपूर्वक कारर्वाकडे दूर्लक्ष केल्या प्रकरणी पोलीस आयुक्त , राज् पर्यावरण प्राधिकारण आदी विभागांकडे पत्राव्दारे केली आहे.