रेती बंदरवरील कारवाई विरोधात महासभेत पडसाद

0

कल्याण : जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार केडीएमसीचे आयुक्त व आधिकारीवर्गाने कल्याण रेतीबंदर परिसरातील रेती व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई केली. त्यात ७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. जप्त केलेली मालमत्ता नष्ट करण्याचा आधिकार त्यांना आहे का असा संतप्त सवाल अपक्ष नगरसेकवक काशिब तानकी यांनी गुरुवारी महासभेत केला. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे आयुक्त व महापौरांनी स्पष्ट करताच जिल्हाधिकारी खून करायला सांगतील तुम्ही कराल का असा प्रतिसवाल करत तानकी यांनी मुददे मांडले. तसेच प्रशासनाकडे जाब मागताना प्रसंगी सभेचे कामकाज रोखून धरण्याचा इशारा दिला.

अत्पल्प कालावधीत नोटीस रेतीबंदरमधील रेती व्यावसायिकांविरोधात जिल्हाधिका-यांनी कारवाई केली.त्यासाठी पालिका आयुक्त कर्मचारी व आधिकारी यांची मदत घेण्यात आली होती. रेती व्यावसायिकांचे ड्रेझर्स संक्शन पंप, क्रेन आदी साहित्य कारवाईत जप्त करण्यात आले. गॅसकटरने त्याचे तुकडे करुन ते खोडीत फेकण्यात आले. तसेच एक कोटी ९४ लाखांची लिलावात घेतलेली रेतीही जप्त करुन ती खाडीत पुन्हा फेकून देण्यात आली. कोटयावधींची मालमत्ता जप्त करुन ती नष्ट करण्याचा आधिकार महापालिका आधिका-यांना कोणी दिला इतकेच नाही तर या परिसरातील १५० बांधकामांना नोटिसा दिल्या गेल्या. सात हजार रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे व त्यांचे हाल झाले. तेथील तबेल्यांमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त म्हशी आहेत. दुधाचा मोठा व्यापार आहे. रेती कारवाईच्या विरोधात मी नाही. चुकीच्या पध्दतीने कारवाई केली गेली.  मी रेती व्यावसायिक नाही.रेती व्यवसायावर पाच हजार जणांचा रोजगार आहे. त्यांचे नुकसान व रोजगार महापालिका भरुन देणार आहे का असा सवाल करुन समाजाला न्याय देण्यासाठी भांडत असल्याचे तानकी म्हणाले. दरम्यान तानकी यांच्या विषयाने अनेक नगरसेवकांनी हरकत घेतली व अनेक वाद नगरसेवकांनी दिले.  तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर र्चचा होऊ शकत नाही.