मुंबई – रेपो दरात पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात आज गुरुवारी घेण्यात आला. रेपो दर ६.५ टक्क्यांवरून आता ६.२५ टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर विविध कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्याकडे लक्ष लागले होते. व्याजदरात कपात केली जावी, अशी मागणी केली जात होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्त्वाखाली मंडळाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.