रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’च; आरबीआयची घोषणा

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचा विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रात जाणवू लागले आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेटमध्ये बदल करू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नसून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थेच ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रेपो रेट सध्या ४ टक्के आहे तर रिव्हर्स रेपो रेट ३.३ टक्के आहे. कोरोनामुळे नुकसान झाल्याने पुन्हा उभारी देण्यासाठी यापूर्वी रिझर्व्ह बँकेने आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा आर्थिक उभारीला होणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जावर बँका देत असलेल्या व्याजाला रेपो रेट म्हणतात तर ज्या व्याजाने बँका रिझर्व्ह बँकेत पैसे ठेवतात त्याला रिव्हर्स रेपो रेत म्हणतात.