रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांची कपात !

0

मुंबई: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने आज बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे. त्यामुळे ही कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे.

रेपो दर (तो व्याज दर, ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देते) ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर आरबीआयने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.