जळगाव। इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत रेफ्रीजरेटेड सेंटरीफ्यूज मशीनचे उद्घाटन अंगारिका चतुर्थीच्या मुहूर्तावर संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पूजन करून व संस्थेचे कर्माचारी शीतल शिंपी यांचे हस्ते रेफ्रीजरेटेड सेंटरीफ्यूज मशीनचे उद्घाटन झाले. याप्रसंगी या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी गनी मेमन, विनोद बियाणी, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अनिल कांकरीया , राजेश यावलकर, सतिष चरखा , घन:श्याम महाजन, प्रा. शेखर सोनाळ्कर, पुष्पाताई भंडारी तसेच रेडक्रॉसचे कर्मचारी डॉ. प्रकाश जैन, डॉ. अनिल चौधरी, लक्ष्मण तिवारी, उज्वला वर्मा, डॉ. श्रद्धा महाजन, महेश सोनगीरे, संजय साळुंखे, सतिष मराठे, टी.आर. जोशी, सौ. रोहिणी देवकर, किरण बाववस्कर, विरेन्द्र बिर्हाडे, राजेंद्र इंगळे, सौ. शीतल शिंपी आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मशिनविषयी देण्यात आली माहिती
ब्लड कोम्पोंनंट सेपरेशन यूनिट ची संस्थेला मान्यता असल्यामुळे 100 टक्के रक्त घटकाची निर्मिती करून रक्त घटकाचा पुरवठा गरजू रुग्णांना करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे स्वागत डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी व अनिल कांकरीया यांनी केले. पूजेचे पौराहित्य लक्ष्मीकांत त्रिपाठी यांनी केले.