रेमंडच्या कामगारांचे 78 लाख रुपये केले गडप

0

जळगाव । रेमंड कंपनीच्या कामगारांचे जवळपास 78 लाख रूपये युनियनच्या अध्यक्ष व सभासदांनी आपल्या नावावर वर्ग केले असून स्वत:साठी पैशांचा विनियोग केला आहे. त्यामुळे या आठ संशयितांवर गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी उपमहापौर ललीत कोल्हे यांनी केेली आहे. ललीत कोल्हे यांनी रेमंड युनियनच्या गैरव्यवहाराची माहिती पत्रकार परिषदेचे देण्यात आली. े कामगार उत्कर्ष युनियनने कामगारांचे 78 लाख तीन हजार 146 रूपये आपल्या खात्यावर वर्ग करून गैरव्यवहार केला आहे. याबाबत दिलीप रडे, पद्माकर खडके, शिरीष पाटील, जगन्नाथ पाटील, रमेश कोल्हे, मधुकर भंगाळे, प्रदिप वायकोळे या सात जणांनी पोलीस अधिक्षकांना तक्रार दिली आहे.

12 वर्षापासून युनियनने ऑडीट केलेले नाही
या तक्रारीत रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या पदाधिकारींविरोधा तक्रार करण्यात आली आहे. यात युनियनचे अध्यक्ष दिलीप महाजन, उपाध्यक्ष दिवाकर चौधरी, सचिव तुषार राणे, सुनिल फालक, अनिल पाटील, नवल पौलाद पाटील, दिलीप वराडे, किरण भारंबे जणांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. कामगार युनियनचे जवळपास 12 वर्षापासून युनियनने ऑडीट केलेले नाही. त्यामुळे 12 वर्षापासून कामागारांचा पैसा युनियनच्या खिशात जात आहे. युनियनच्या शिखात पैसा गेल्याने कामगारांना त्यांचा लाभ मिळत नाही याबाबत आपण सहाय्यक कामगार आयुक्तकडे माहितीचा अर्ज केला होता. या अर्जाद्वारे युनियनचा गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे. कामगार उत्कर्ष सभा ही नोंदणीकृत संस्था आहे. कामगारांना नुकसानभरपाई, अपघात, बेरोजगारी आदी बाबींचा सामना करावा लागल्यास ही संस्था मदत करते. त्यासाठी कामगारांचा पैसा कपात केला जातो. परंतु, संस्थेतील अध्यक्ष आदींनी या पैशांवरच डल्ला मारल्याने प्रशासनाने लवकरात लवकर फिर्याद दाखल करून करवाई करावी, अशी मागणी उपमहापौर ललीत कोल्हे यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास आपण न्यायालयात जाणार असल्याचे उपमहापौर कोल्हे यांनी सांगितले.