चार कर्मचार्यांना निलंबित केल्याचा केला निषेध
जळगाव । रेमंड कंपनीच्या कर्मिक विभागाने विभागाने कंपनीतील चार कर्मचार्यांना निलंबित केल्याने दुपार शिपच्या कर्मचार्यांनी काही वेळ कामबंद आंदोलन पुकारले होते. या कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने आंदोलन देखील मागे घेण्यात आले. रेमंड कंपनीतील कर्मचार्यांच्या वार्षिक करार चार महिने होवूनही झालेला नसल्याने, कर्मचार्यांनी याबाबत कार्मिक विभागाचे अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी कर्मिक अधिकारी यांनी जनरल मॅनेजर यांच्याशी चर्चा करण्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीतील ए.बी.महाजन, वाय.बी.बर्हाटे, एस.पी.ढाके, एन.जे.कोल्हे यांच्यासह काही कर्मचारी कराराबाबतची भुमिका मांडण्यासाठी गेले असता, ए.बी.महाजन, वाय.बी.बर्हाटे, एस.पी.ढाके, एन.जे.कोल्हे या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आज दुपारी दुसर्या शिपमधील कर्मचार्यांनी काही वेळेसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. या कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर कर्मचार्यानी तात्काळ आंदोलन मागे घेतले.