घरकामगार महिलांसह तिच्या मुलींवर संशय ; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव- शहरातील अनुराग स्टेट बॅक कॉलनी पसिरातील राजेश भास्कर शिंदे यांच्या घरातून 2 लाख 20 हजारांचे दागिणे चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. शिंदे यांनी त्यांच्या घरात घरक ाम करणार्या महिलेसह तिच्या दोन मुलींवर संशय व्यक्त केला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेट बँक कॉलनी परिसराती परीस हाईटस् मध्ये राजेश शिंदे हे पत्नी, मुलगी व मुलांसह वास्तव्यास आहेत. शिंदे रेमंड कंपनीत नोकरीला तर त्यांची पत्नी स्मिता ह्या सेंट जोसेफ विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी आहेत. दोन मुले शिक्षण घेत असून शाळेला सुट्या असल्याने ते घरीच आहेत. शिंदे यांनी वर्षभरापासून त्यांच्या घरी घर कामासाठी पल्लवी पद्माकर चव्हाण रा. वंजारी टेकडी, समता नगर, यांच्यासह त्यांच्या मुलींना कामावर ठेवले आहे.
वटसावित्रीच्या पूजेच्या तयारीदरम्यान प्रकार उघड
9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता स्मिता शिंदे यांनी त्यांचे दागिणे घरातील दिवाणमध्ये , 1 लाख 20 हजार रुपये किमतीची 60 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या व 1 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पेन्डल असे एकूण 2 लाख 20 हजार रुपयांचे दागिणे ठेवले होते. 16 जून रोजी शिंदे हे नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता ड्युटीवर निघून गेले. यानंतर वटसावित्री पौर्णिमा असल्याने सकाळी 10 स्मिता ह्या तयारी करीत होत्या. पूजेसाठी जायचे असल्याने त्या दिवाणमध्ये ठेवलेले दागिणे घेण्यास गेल्या असत्या त्यांना दागिणे सापडले नाही. सर्व घरात शोध घेतला मात्र मिळून आले नाही. त्यांनी पती शिंदे यांना प्रकाराबाबत माहिती दिली. ते 11.30 वाजता घरी पोहचले. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. घरकाम करणार्या पल्लवी चव्हाण वय 38, व मुली जयश्री चव्हाण (वय 17) व निकीता चव्हाण (वय 15) यांनी चोरीचा केल्याचा संशय व्यक्त केला आहे.