जळगाव ।
एखाद्या कोविड रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये जर 40% इन्स्पेक्शन झाले असेल, तरच रेमडेसिव्हरचा उपयोग केला जावा. यामुळे या इंजेक्शनचा अनावश्यक वापर थांबेल, अशी माहिती सिव्हील सर्जन नागोराव चव्हाण यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.
डॉ. चव्हाण म्हणाले की, रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर सिटीस्कॅनचा रिपोर्ट करून घेतो. या रिपोर्टमधील स्कोअर हा 10 असल्यास या रुग्णाला रेमडेसिव्हीरचा डोस देण्यात यावा. कारण, 10 हा स्कोअर येणे म्हणजे त्या रुग्णाचे 40 % फुफ्फुस हे कोरोनाच्या विषाणूने बाधित झालेले असते. पण, कित्येकदा आपण असेही पाहतो की, इन्फेक्शन वाढू नये म्हणून दहाचा स्कोअर नसतानादेखील डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शन देतात तेही चुकीचे आहे.
कुटुंबीयांनी जादा इंजेक्शन खरेदी करू नयेत
काही प्रसंग असेही घडले आहेत की, डॉक्टर रेमडेसिव्हीरचे एक इंजेक्शन मागवतात मात्र, रुग्णाचे नातेवाईक हे काळजीपोटी एखाद-दोन जास्तीचे इंजक्शन घेऊन ठेवतात. परंतु, हे इंजेक्शन ठराविक तापमानात ठेवले नाही, तर ते खराब होते. त्यामुळे कुटुंबीयांनीही घाबरून जाऊन जास्तीचे इंजेक्शन विकत घेण्याची गरज नाही.
दोनपेक्षा अधिक इंजेक्शनची गरज असूच शकत नाही
कोविडबाधित कोणत्याही रुग्णाला दोनहून अधिक इंजेक्शनची गरज असूच शकत नाही. कारण, रेमडेसिव्हीरचा पहिला डोस हा 200 मिली ग्रॅमचा असतो तर दुसरा डोस हा 100 ग्रॅमचा असतो, असेही सिव्हील सर्जन डॉ. नागोराव चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.