रेल्वेखाली अनोळखी युवक जखमी

0

पाचोरा। पाचोरा येथील रेल्वे कि.मी. नंबर 374/14 जवळ एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत रेल्वे पालिसांना आढळून आला. सदर इसमाचे वय 20/22 वर्ष, उंची 5 फुटअसुन त्याने राखाडी रंगाचा शर्ट, लाल रंगाची जिन्स पन्ट परिधान केलेली आहे.

त्याचे डोक्याला गंभीर इजा झाल्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यास जळगांव येथील सिव्हिल हास्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी युवकाची ओळख पटविण्याचे आव्हान पाचोरा रेल्वे पोलिस श्री. बोरसे यांनी केले आहे.