आईशी भांडण झाल्यानंतर रेल्वे लाईनवर पोहचली ; पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती कॉलनीत रहिवासी
जळगाव : शहरातील बजरंग बोगद्यानजीक रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजता समोर आली होती. सोमवारी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांवरुन तिची ओळख पटली असून गायना सुनील खैरनार (18 रा. त्रिमुर्ती कॉलनी) असे तिचे नाव आहे. दरम्यान ती बेंडाळे महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
बजरंग बोगद्यानजीकच्या अप रेल्वलाईनवर खांबा क्रमांक 418/8-10 जवळ धावत्या सचखंड एक्सप्रेसच्या समोर गायना खैरनार हिने झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता घडली. दरम्यान, अंगात टी शर्ट व हाप पॅन्ट परिधान केलेली होती. जवळ मोबाईल किंवा ओळख स्पष्ट होईल अशी काहीच वस्तू आढळून आली नव्हती. त्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
कपड्यांवरुन पटली ओळख
गायना रविवार सकाळपासून घरातून गेल्याने कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला. पनवेल येथे रिलायन्स कंपनीत असलेले वडील सुनील गोपाळ खैरनार हे देखील तातडीने घरी दाखल झाले. रविवारी रात्री त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनलाही जावून चौकशी केली, मात्र तेथेही काहीच माहिती मिळाली नाही. सोमवारी सकाळी रेल्वेखाली तरुणीची आत्महत्या असे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त तरुणीचे मामा निंबा सोनवणे यांची वाचले. त्यांनी मुलीचे काका आत्माराम खैरनार व शेजारी राहणारे पोलीस कर्मचारी अतुल पाटील यांना सोबत घेऊन थेट जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनगृहात गेल्यावर चेहजयाचा चेंदामेंदा झाला होता, मात्र कपड्यांवर तिची आळख पटली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गायना हिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होत नाही. आईशी भांडण झाल्यानंतर गायना थेट रेल्वे लाईनवर पोहचली व आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, खैरनार कुटुंब मुळचे पाडळसे, ता.यावल येथील रहिवाशी आहेत. वडील पनवेल येथे नोकरीला आहेत तर घरी आई मनिषा, लहान भाऊ पार्थ असे तिघंच रहायचे. पार्थ हा अकरावीत तर गायना बारावीत शिक्षण घेत होती. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह वडीलांच्या ताब्यात देण्यात आला.