जळगाव। रेल्वे खाली आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप त्या इसमाची ओळख पटलेली नसून नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ममुराबाद रेल्वे लाईनवर एक अनोळखी इसम रेल्वेखाली आल्याने गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्यास जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काही तासातच उपचार घेत असतांना त्या अनोळखी इसमाच मृत्यू झाला. याप्रकरणी सीएमओ दशहरे यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्माम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास मगन मराठे हे करीत आहेत.
वृध्दाचा उपचारा दरम्यान मृत्यू
जळगाव । जिजाऊ नगरातील वृध्दाची प्रकृति खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिजाऊ नगरातील रहिवासी राघव सकाराम धनगर (वय-65) यांना रविवारी सकाळी 7.30 वाजता अचाकन झटके आल्याने त्यांना सकाळीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय अधिकार्यांकडून उपचार करण्यात आले. मात्र, सकाळी 11.55 वाजेच्या सुमारास उपचार घेत असतांना राघव धनगर यांचा मृत्यू झाला. तर याप्रकरणी सीएमओ डॉ. विजय कुरकुरे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास मगन मराठे हे करीत आहेत.