रेल्वेखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू : पाचोरा रेल्वे स्थानकावरील घटना

A stranger died after being hit by a moving train in Pachora पाचोरा : अनोळखी इसमाचा रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ अप रेल्वे लाईनीवर घडली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अप रेल्वे लाईनवर आढळला मृतदेह
पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांबा किलोमीटर क्रमांक 371/28/30 दरम्यान अप रेल्वे लाईनवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेखाली आल्याने 35 ते 40 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू ओढवला. मयत इसमाची उंची पाच फूट सहा इंच, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, उजव्या हाताच्या दंडावर दिल आकाराचे स्टॅच्यु स्केच तसेच अंगात निळ्या हिरव्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे.

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन
शवरुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार, बबलु मराठे यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी 9027152967 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधाव, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ए.एस.आय.ईश्वर बोरुडे यांनी केले आहे.