रेल्वेखाली आल्याने पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

0
खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल. 
जळगाव – अमळनेरहून जळगावला रेल्वेने अमळनरे येथील पोलीस कर्मचारी येत असतांना रेल्वेूतून पडल्याने रेल्वेच्या खाली पायाचा पंजा तुटल्याची घटना घडली असून रेल्वे पोलीसांनी त्यांना जखमीअवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल केले त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यासाठी ओळखीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, हेमंत वसंत न्हायदे (वय- 30) रा. चांदसी कळमगांव ता. चोपडा हे अमळनेर पोलीस स्थानकात पोलीस कर्मचारी म्हणून नियुक्तीस आहे. सध्या गणपतीचा उत्सव असल्याने त्यांचा चाळीसगाव येथील भागात पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांच्या कोर्ससाठी अमळनेरहून जळगावला रेल्वेने येत होते. जळगावला आल्यानंतर रेल्वे गाडी हळू झाल्यानंतर रेल्वेतून उतरतांना पाय अडकल्यांने त्यांचा डाव्या पायाचा पंजा अडकल्याने पायाचा पंजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्रवाश्याने ओढली रेल्वे चैन
दरम्यान याठिकाणी पोलीस कर्मचारी हेमंत न्हायदे यांचा पाय रेल्वेत अडकल्याचे पाहून रेल्वेत असलेल्या एका प्रवाश्याने तातडीने रेल्वे बोगीची चैन ओढून रेल्वे थांबविली. त्यानंतर खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना स्वातंत्र्य चौकातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्या पायातून अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.