जळगाव – दसऱ्याच्या निमित्ताने राजकोटहून पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे रेल्वेने जात असतांना जळगाव रेल्वे स्थानकावर पडल्याने
एका 50 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, राजू प्रमा चव्हाण (वय – 50) रा.कुरंगी ता.पाचोरा ह.मु. राजकोट, गुजराथ हे
आपल्या परीवारासह राजकोट येथे राहतात. दसरा असल्याने ते राजकोटहून एकटे रेल्वेने कुरंगीकडे जात असतांना सकाळी 10 वाजेच्या
सुमारास रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.