भुसावळ- धावल्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी 35 ते 40 वर्षीय ईसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी घडली. डाऊन रेल्वे लाईन खांबा क्रमांक 441/1-3 या ईसमाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी आनंद गंगादीन मुकडदम (युनिट नं.12, मेन लाईन, सेंट्रल रेल्वे, भुसावळ) यांनी तालुका पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बोंडे करीत आहेत.