पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रकार
जळगाव ः पाचोरा रेल्वे स्थानकावर गोवा एक्स्प्रेसखाली आल्याने महिला पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संगीता शिवाजी निकम असे मयत महिला कर्मचार्याचे नाव आहे.कोणत्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच निकम या पोलीस दलात भरती झाल्या होत्या तर भडगाव पोलिसात त्यांची नियुक्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेमकी घटना कशी घडली? याबाबत कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.