रेल्वेखाली एकाची आत्महत्या

0

जळगाव । हरीविठ्ठल नगरजवळ असलेल्या अर्जून नगरमधील राहणार्‍या 22 वर्षीय व्यक्तीने रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आशाबाबा कॉलनीजवळ रेल्वे रूळावर स्वतःला झोकून दिल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली असून रामानंद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप वाळू वराळे (वय-22) रा. अर्जुन नगर हा आपल्या लहान भावासोबत मामांकडे लहानपासून राहत होता. घरातील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून रात्री 10 वाजेच्या सुमारास घरातून पडला. त्यानंतर आशाबाबा नगर जवळ असलेल्या रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक 417 ते 409 दरम्यान स्वतःला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास भरधाव रेल्वे समोर झोकून दिले. त्यामुळे रेल्वेच्या धक्क्यामुळे संदीपचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह रूळावरच पडून होता. रेल्वेचे उपस्टेशन प्रबंधक एस.के.सिंग यांच्या खबरीवरून रामांनद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.कॉ.काशिनाथ कोळंबे करीत आहे.