भुसावळ– तालुक्यातील सुसरी शिवारात रेल्वेखाली आल्याने पावरा समाजातील दोघांचा जागीच करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
गणेश भुरा पावरा (30, रा.किर्या, बैजपूर, जि.खरगोन) व सुरपाल उर्फ टक्ल्या अनसिंग पावरा (30, आंबापाणी, ता.यावल) अशी मयतांची नावे आहे. घटनेचे वृत्त कळताच वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी व नाईक संदीप बडगे यांनी धाव घेत पंचनामा केला. दोघाही मयतांनी मद्य सेवन केल्याने ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वरणगाव पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.