जळगाव । बोरनार येथील कर्जबाजारी वृध्दाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिनकर कृपाराम वाणी (वय 55, रा. बोरनार) यांच्यावर अनेक बँकांचे कर्ज झाले होते. त्यामुळे परतफेड होत नसल्याने ते नेहमी चिंतेत राहत होते. यावेळी कर्ज वाढतच गेल्याने अखेर शनिवारी 17 रोजी जळगाव-पाचोरा रेल्वेलाईनवर म्हसावद-माहिजी दरम्यान असलेल्या अप लाईन खांबा क्रमांक 325/04 यावर धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत एमआयडीसी पोलिस स्थानकात एम.के. सिंग यांचे खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.