रेल्वेखाली येऊन अनोळखी पुरूषाचा मृत्यू

0

जळगाव। रेल्वे खाली येवून अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अद्याप अनोळखी पुरूषाची ओळख पटलेली नाही. जळगाव-शिरसोली डाऊन लाईनीवरील खांबा क्रं. 415/22 ते 415/24 दरम्यान एका अनोळखी पुरूषाचा रेल्वे खाली येवून मृत्यू झालेला मृतदेह शनिवारी पहाटे 3.45 वाजेच्यापूर्वी आढळून आला आहे.

याप्रकरणी जळगाव स्टेशन प्रबंधक ए.एस.कुलकर्णी यांनी दिलेल्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्या पुरूषाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणाचा पूढील तपास विजय निकुंभ हे करीत आहेत.