रेल्वेखाली येऊन दोन सख्या भावांचा मृत्यू

0

औरंगाबाद-औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश बागुल आणि जयेश बागुल अशी या दोघांची नावे आहेत.

आकाश आणि जयेश या दोघा भावंडात भांडण झाले होते. त्या रागातून मोठा भाऊ आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी लहान भाऊ त्याच्या मागे गेला. मोठा भाऊ पळत होता त्याच्यामागे त्याला असे करू नकोस असे सांगत लहान भाऊही पळू लागला. मात्र रेल्वेखाली चिरडून या दोघांचाही मृत्यू झाला.

या दोघांचे मृतदेह घाटी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. जयेश बागुल कंत्राटी काम करत होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते अशीही माहिती मिळाली आहे.