रेल्वेखाली वयोवृद्धाची आत्महत्या

0
जळगाव । शिरसोली येथील राहणार्‍या 60 वर्षीय वयोवृद्धाने घरघुती किरकोळ कारणामुळे रेल्वे खाली येवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर राजाराम पाटील (वय-60) रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांनी सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अप मेन लाईनच्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केल्यानंतर पोलीसांनी धाव घेतल्यानंतर तात्काळ रहिवाश्यांकडून मयताची ओळख पटली होती. शिरसोली स्टेशन प्रबंधक  यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.