रेल्वेखाली शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या

0

जळगाव – कौटुंबिक वादाच्या कारणावरून शिरसोली येथील राहणाऱ्या शिरसोली रेल्वे लाईनवर दापोरा पुलावर आज सकाळी 7.30 वाजेदरम्यान अप लाईनवर रेल्वे खाली स्वत:ला झोकुन देवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

याबाबत माहिती अशी की, निलेश सुधाकर पाटील (वय-25) रा. शिरसोली प्र.बो. ता.जि. जळगाव असे मयताचे नाव आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यानच्या रेल्वेच्या पटरीच्या मधोमध बसून जळगावकडून मुंबईकडे जाणारी झेलम एक्सप्रेसच्या समोर येवून आत्महत्या केली. निलेशचे शरीर एवढे छिन्नविछिन्न होते की त्याची ओळख पटणे पोलीसांना कठीण होत होते. त्यांच्या हाताला नाव गोंदलेले असल्याने त्यांची ओळख पटली.