रेल्वेगार्डने चोरला नळ

0

मुंबई । तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाश्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात आल्या आहे.यापूर्वी प्रवाशांनी हेडफोन्स किंवा अन्य साहित्या चोरल्याचे समोर आले होते. याच एक्सप्रेसचे गार्ड मनोज भडांगे हे माझगाव ते छत्रपती शिवाजी टर्मिनलमध्ये देखभालसाठी ड्युटीवर होते त्यावेळेस त्यांनी वॉशरूममधील हॅण्डशॉवर चोरत असतांनाचे संपूर्ण चित्रण सीसीटिव्हीत कैद झाले. याच फुटेजमुळे एक्स्प्रेसमधील हॅण्डशॉवर चोरणारा सर्वांसमोर आला आहे. भडांगेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.