रेल्वेचा उद्या मेगाब्लॉक ; मुंबई पॅसेंजरसह सहा गाड्या रद्द

0

रेल्वे प्रवाशांची गैरसोय ; 9 गाड्या शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर रविवार, 19 दुरुस्तीच्या कामासाठी साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात येत असून भुसावळ-मुंबई पॅसेंजर सहा रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे गाड्यांना आधीच गर्दी असताना एक्स्प्रेस गाड्यांसह पॅसेंजर रद्द केल्या जात असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ब्लॉकमुळे पॅसेंजर सहा गाड्या रद्द
51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर 19 रोजी रद्द करण्यात आली आहे तसेच 12118 मनमाड एलटीटी गोदावरी एक्सप्रेस, 12117 एल.टी.टी.-मनमाड गोदावरी एक्सप्रेस, 22102 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, 22101 मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस रविवारी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्या धावणार उशिराने
गाडी क्र.12812 एलटीटी स्थानकावर दुपारी 4.15 वाजता, 11094 मुंबईऐवजी दादरला दुपारी 2.15 ऐवजी दुपारी 4.30 वाजता, 12294 एलटीटी स्थानकावर 2.55ऐवजी 4.30 वाजता, 12142 एलटीटी स्थानकावर 3.15 ऐवजी 5.10 वाजता, 11080 एलटीटी स्थानकावर 4 ऐवजी 5.30 वाजता, 11060 एलटीटी स्थानकावर 4.15 ऐवजी 5.45 वाजता, 12168 एलटीटी स्थानकावर 12.15 ऐवजी चार वाजता पोहोचणार आहे. दरम्यान, 12139 मुंबई नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस 19 मे रोजी मुंबई ऐवजी नाशिक ते नागपूरदरम्यान धावेल.

या गाड्या विलंबाने सुटणार
रविवारी कल्याण ते कसारा दरम्यान सकाळी 11.15 ते दुपारी 2.45 या काळात साडेतीन तासांचा अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असल्याने पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेल, कल्याणऐवजी दौंड, मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. यासह एलटीटी ते मुझफ्फरपूर एक्सप्रेस 12.15 ऐवजी दुपारी 1.30 वाजता, मुंबई हावडा 11.05 ऐवजी दुपारी 3 वाजता, एलटीटी-गोरखपूर 10.55 ऐवजी दुपारी 2.30 वाजता सुटेल. एलटीटी गोरखपूर सकाळी 11.10 ऐवजी दुपारी 3 वाजता, मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल 11 ऐवजी 30 3.15 वाजता, एलटीटी वाराणसी 12.40 ऐवजी 2.10 वाजता, मुंबई जबलपूर 1.30 ऐवजी 1.45 वाजता, मुंबई – अलाहाबाद हॉलिडे स्पेशल 4.40 ऐवजी 20 मे रोजी रात्री 12 वाजता सुटेल. जालना दादर जनशताब्दी सकाळी 4.45 ऐवजी 7.45 वाजता सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घेवून गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.