भुसावळ- पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या इसमाला रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. सुनील भास्कर वारके (50, विठ्ठल मंदिर वॉर्ड) असे मयताचे नाव आहे. सुनील वारके हे गुरूवारी सकाळी रेल्वेच्या उड्डाणपुलाकडे फिरायला गेले असता रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांना कुठल्यातरी रेल्वे गाडीचा फटका बसल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते फेकले जावून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी सोशल मिडीयावर अनोळखी इसमाच्या मृत्यूबाबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची ओळख पटली. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज ठाकरे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत सुनील वारके यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला, याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रवीण भास्कर वारके यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक मनोज ठाकरे पुढील तपास करीत आहे.