रेल्वेची ऑफरः अन् 10 हजार रुपये फ्री मिळवा

0

मुंबई । ’इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’द्वारे (आयआरसीटीसी) एक खास ऑफर आली आहे. आता तुम्ही घरबसल्या 10 हजार रूपये कमावू शकतात. यासाठी तुम्हाला केवळ तुमचं आधार कार्ड आयआरसीटीसी सोबत लिंक करायचे आहे.तुम्हाला केवळ तुमचं आधार कार्ड आयआरसीटीसी सोबत लिंक करायचं असून किमान एक तिकीट बूक करण्याची गरज आहे. आयआरसीटीसी अंतर्गत जून 2018 पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.आयआरसीटीसी अकाउंटवरून एका महिन्यात 12 तिकीट बूक करू शकणार आहे. आधारसोबत अकाउंट लिंक नसलेले युझर एका महिन्यात केवळ 6 तिकीट बूक करू शकतात.

आयआरसीटीसी ची ही ‘लकी ड्रॉ स्कीम’
या ऑफरला आयआरसीटीसी ने ‘लकी ड्रॉ स्कीम’ नाव दिले आहे. या ऑफरनुसार दर महिन्याच्या दुस-या आठवड्यात लकी ड्रॉ काढला जातो. ही संपूर्ण प्रक्रीया संगणकावर आधारित असते. संगणकाच्या आधारे दरमहिन्याला 5 लकी विजेते निवडले जातात. या विजेत्यांना 10 हजार रुपयांची रोख रक्कम मिळते. डिसेंबरमहिन्यापासून ही स्कीम सुरू झाली असून पुढील सहा महिने सुरू असणार आहे. ज्यांनी आधार केवायसी केले आहे, आणि ज्यांनी नोंदणी केली आहे अशेच युजर्स या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. युझरने किमान एक तिकीट बूक करण्याची गरज असून, बुकिंग करणा-या युझरची माहिती आयआरसीटीसीच्या प्रोफाइलसोबत जुळायला हवी. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर या स्कीमबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.