रेल्वेच्या अतिक्रमणावर 12 डिसेंबरपासून हातोडा

0
मोहिम ; रेल्वे सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात निघणार अतिक्रमण
भुसावळ : रेल्वेच्या जागेवर अनधिकृतरीत्या झोपडपट्टी उभारून राहणार्‍यांचे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 12 डिसेंबरपासून मोहिम आखली असून 28 डिसेंबरपर्यंत ती चालणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या कडेकोट बंदोबस्तात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.