भुसावळ- रेल्वेच्या दि सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.(ईसीसी सोसायटी) या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत एनआरएमयुचा वाढता प्रभाव दिसून आल्याने पदाधिकार्यांसह संघटना सदस्यांनी जोरदार जल्लोष केला. सुमारे 45 वर्षांपासून या सोसायटीवर एनआरएमयुचे वर्चस्व आहे. बुधवारी 35 जागांसाठी निवडणूक पार पडली होती तर गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळी एनआरएमयुने 15 जागांवर यश मिळवले होते तर सीआरएमएस तीन तसेच ट्रॅकमन असोशिएशनला एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत निवडणुकीतील मतांची मोजणी चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी जाहीर होणार अधिकृत निकाल
बडनेरा येथे एनआरएमयु व सीआरएमएसच्या उमेदवारांना सारखे मते मिळाल्याने त्यांचा निर्णय आता मुंबईत होईल, असे सूत्रांनी सांगितले. डीआरएम कार्यालयाच्या कार्मिक विभागाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एन.डी. गांगुर्डे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. या संस्थेवर कोणती संघटना वर्चस्व मिळवते हे मात्र शुक्रवारीच कळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे उमेदवार झाले विजयी
सुनील शेलार, कुंद महापात्रा, उमेश शेलार (नाशिक), अंबादास निकम, विलास मुलमुले, परवीन अहिरे, नितीन पवार (सीआरएमएस, मनमाड), मिलींद खेडकर (नांदगाव), पुरूषोत्तम सोनवणे (सीआरएमएस, चाळीसगाव), प्रकाश जाधव (ट्रॅकमन असोशिएशन, पाचोरा), कुंदन जावळे, किशोर कोलते (सीआरएमएस, पीओएच), पुष्पेंद्र कापडे, देवानंद रजक, योगेश गुप्ता (खंडवा), संतोष चौधरी, संदेश पहूरकर, मोहंमद जहीर महंमद (अकोला) यांनी विजय मिळवला.